लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव गुरूवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025
बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2025 चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2025 चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल.
लालबागच्या राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी दि. बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 05:00 वाजल्यापासून ते रविवार दि. 07 सप्टेंबर 2025 अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत चालु राहिल.
लालबागचा राजा 2025 चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.
यूट्यूब चॅनल:
फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
ट्विटर (X) अकाऊंट:
Tweets by LalbaugchaRaja
वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन : 2025 वर्ष 92 वे
सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा करीत आहोत…
त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचे, प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन रविवार दिनांक
24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ठिक 7.00 वाजता आयोजीत करण्यात आले आहे.
प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी यांची नोंद घ्यावी.
सदरचे live प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेल वर दिसेल.
सुधीर सिताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ