लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९२ वे. 2025

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता गुरूवार दि. ०४-०९-२०२५ रोजी चरणस्पर्शाची रांग रात्री १२:०० वाजता व मुखदर्शनाची रांग शुक्रवार दि. ०५-०९-२०२५ रोजी रात्री १२:०० वाजता बंद करण्यात येईल.


For the preparation of Lalbaugcha Raja’s immersion procession, the queue for “Charansparsh Darshan” (touching the feet) will be closed on Thursday, 04-09-2025 from 11:59 pm, and the queue for “Mukh Darshan” (idol viewing) will be closed from Friday, 05-09-2025 at 11:59 pm.

Lalbaugcha Raja 2025 Aarti Videos Playlist

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे. 2025

बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 5:00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव 2025 चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल 2025 चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी 6:00 नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल.
लालबागच्या राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी दि. बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 05:00 वाजल्यापासून ते रविवार दि. 07 सप्टेंबर 2025 अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत चालु राहिल.

लालबागचा राजा 2025 चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

यूट्यूब चॅनल:

फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

ट्विटर (X) अकाऊंट:

वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com

Android and iOS App : Lalbaugcharaja

#lalbaugcharaja

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सन : 2025 वर्ष 92 वे

सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते शनिवार 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा करीत आहोत…

त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत असलेल्या लालबागचा राजाचे, प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन रविवार दिनांक
24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी ठिक 7.00 वाजता आयोजीत करण्यात आले आहे.

प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी यांची नोंद घ्यावी.

सदरचे live प्रक्षेपण आमच्या YouTube चॅनेल वर दिसेल.

सुधीर सिताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

 

Lalbaugcharaja Muhurta Puja 2025

गणेश मुहूर्त पूजन २०२५

जय गणेश 🙏

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

वर्ष ९२ वे

🌺 •••गणेश मुहूर्त पूजन •••🌺

यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन शनीवार दिनांक 14 जून 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक 6 वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत संपन्न झाला.
सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.