Home
लालबागचा राजा चे प्रथम दर्शन ( प्रिंट व डिजिटल माध्यमांसाठी ) शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे. सदरचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत YouTube चॅनलवर पहाता येईल. लालबागचा राजा २०२३ चे थेट प्रक्षेपण पहाण्याकरीता YouTube channel subscribe करा.
लालबागाच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आपतकालिन सेवा
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे संकटाचा डोंगर कोसळला. ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने इर्शाळवाडीतील नागरिकांना सावरण्यासाठी तातडीने तेथे धाव घेतली. मंडळाच्या आपत्कालीन सेवा पथकाने शुक्रवारी सकाळी घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांना मदतीचा हात दिला. दोन मोठे टेम्पो भरुन मदतीचे साहित्य इर्शाळवाडीत पोहोचविण्यांत आले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा मंडळाने महाराष्ट्रात अनेकवेळा आलेल्या अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये आतापर्यंत स्वयंस्फूर्तीने मदतकार्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यात 26 जुलै 2005 रोजी रायगडमधील जुई गावात अशाचप्रकारच्या झालेल्या नैसर्गिक दुर्घटननेनंतर त्या गावाचे संपूर्ण पुनर्वसन मंडळाने केलेले आहे.
इर्शाळवाडीतील भीषण दुर्घटनेत जखमी झालेल्या आणि यातून वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकत्यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्यात सहभाग घेतला. मंडळाचे कार्यकर्ते शुक्रवारी 21 जुलै 2023 रोजी सकाळीच इर्शाळवाडीच्या दिशेने रवाना झाले. तेथे आपदग्रस्त नागरिकांची आस्थेने सांत्वन करून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात प्रमुख्याने तेथील जनतेसाठी ब्लॅन्केटस्,चादर,टॅावेल,चटई, महिलांसठीचे आवश्यक कपडे तसेच पुरूषांचे आणि लहान मुलांचे कपडे, रेनकोटस्, पावसाळ्यात उपयुक्त असे गमबूटस्, विविध फळे, सुका खाऊ,बिस्किटस्, टॅार्च बॅटरीज् इ.जिवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यानंतरही भविष्यात या गावासाठी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी मंडळ पुढाकार घेईल असे मंडळाचे मानदसचिव सुधिर सिताराम साळवी यांनी सांगितले.
लालबागाच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आपतकालिन सेवा.
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील ईर्शाळवाडीतील आपदग्रस्त नागरिकांच्या मदतीला…लालबागचा राजा निघाला…
आपत्तीग्रस्तं ईर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या मदतीला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जिवनाश्यक पदार्थ, वस्तू आणि कपड्यांची मदत.
ईर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जीवीत हानी झाली आहे. तसेच अनेक जख्मींवर उपचार देखील सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेत जख्मी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आज मोठी मदत घेऊन निघाले आहेत. दोन मोठे टेम्पो मधून ही मदत पोहचवली जाणार आहे. ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ तसेच विविध अन्नपदार्थ , ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जिवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे. आज शुक्रवार दिनांक २१ जुलै २०२३ सकाळी 10 वाजता ही मदत घेऊन लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून ईर्शाळवाडीकडे मंडळाचे कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
लालबागच्या राजाचे
मंडप पूजन संपन्न
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागचा राजाच्या ९० व्या वर्षातील गणेशोत्सवाचे मंडप पूजन मंगळवार दिनांक ०४ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता संपन्न झाले.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संचालित महिला व पुरूष योग केंद्राच्या विद्यमाने जागतिक योग दिना निमित्त, बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी ठीक सात वाजता *जागतिक योग दिन कार्यक्रम* संपन्न झाला.
सदर योग दिन प्रसंगी पुरूष आणि महिला योगसाधकांनी आरोग्यवर्धक योगासनांची सहजसुंदर प्रात्यक्षिके सादर केली.
“लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न”
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार दि. ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः०० वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्स च्या चित्रशाळेत पार पडले. तदप्रसंगी खजिनदार श्री. मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.
६ मार्च २०११ ला सुरूवात झालेल्या लालबागचा राजा डायलिसिस सेंटरला सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ ला बारा वर्षे अर्थात एक तप पूर्ण झाले.
मंडळाच्या या डायलिसिस सेंटरला एक तप पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मंडळाने “ऋणानुबंध – एक तपाचे” हा कार्यक्रम आयोजित केला होता. या डायलिसिस सेंटरमधे अगदी पहिल्या दिवसापासून ते आजतागायत मंडळासोबत कार्यरत असणारे व डायलिसिस ऊपचार सेवा देणार्या अपेक्स किडनी केअर सेंटरच्या प्रती ऋणानुबंध व्यक्त करून मंडळाने त्यांना “सन्मानचिन्ह” प्रदान करून त्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमाप्रसंगी डायलिसिस ऊपचार घेणार्या व्यक्तिंसह त्यांचे सर्व कुटुंबिय आणि अपेक्स किडनी केअर सेंटरचे संचालक सुप्रसिद्ध नेफराॅलाॅजिस्ट डाॅ.श्रीरंग बिच्चू, डाॅ.पराग, श्री. शिरोडकर तसेच अपेक्स किडनी केअर सेंटरचे सर्व कर्मचारी ऊपस्थित होते.
[ngg src=”galleries” ids=”45″ display=”basic_thumbnail” thumbnail_width=”300″ thumbnail_height=”300″ thumbnail_crop=”0″]लालबागचा राजा २०२२
जगभरातील ७,०९,४३,०२२ भाविकांनी लालबागचा राजा चे ऑनलाईन दर्शन घेतले, आणि १,६७,६९,३२० भाविक लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळ्यात ऑनलाईन सहभागी झाले.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…..
#lalbaugcharaja