जाहिर आभार

Thanks

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने यंदाही लालबागच्या राजाचा ९१वा गणेशोत्सव शनिवार दि. ७ सप्टेंबर ते मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मोठ्या जल्लोषात-उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

हा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सहकार्य करणारे मुंबई पोलीस प्रशासनातील मुंबई पोलीस आयुक्त मा.श्री. विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त मा.श्री. देवेन भारती, कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त
मा.श्री. सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) मा.श्री. अनिल पारस्कर, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-४) मा.श्री. प्रशांत कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त मा.श्रीमती कुमुद कदम, काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. मनीष श्रीधनकर, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. अशोक लांडगे तसेच काळाचौकी पोलीस स्टेशन, भायखळा पोलीस स्टेशन, आग्रीपाडा पोलीस स्टेशन, नागपाडा पोलीस स्टेशन, व्ही.पी. मार्ग पोलीस स्टेशन, दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आणि सर्व कर्मचारी बंधू-भगिनींचे मन:पूर्वक जाहीर आभार !

त्याबरोबरच बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त मा.श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त मा.श्री. अमित सैनी, उपायुक्त मा. श्री. प्रशांत सपकाळे, एफ साऊथ विभागाचे सहाय्यक आयुक्त मा.श्री. महेश पाटील, सहाय्यक अभियंता मा.श्री. प्रशांत बने, तसेच महापालिका प्रशासनातील सर्वच कर्मचारी बंधू-भगिनींचे मन:पूर्वक जाहीर आभार!

त्याचप्रमाणे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणारे सर्व भाविक तसेच विसर्जन मार्गावरील सर्व भाविक आणि विभागातील सर्व रहिवाशी, वर्गणीदार-देणगीदार, व्यापारीवर्ग, कोळी महिला, हितचिंतक, राज्य प्रशासन, विभागातील मंडळे, सामाजिक संस्था, प्रिंट, डिजिटल, इलक्ट्रॉनिक, टीव्ही माध्यमे व त्यांचे प्रतिनिधी आणि समस्त नागरिकांचे मन:पूर्वक जाहीर आभार!