
जय गणेश 🙏
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
वर्ष ९२ वे
🌺 •••गणेश मुहूर्त पूजन •••🌺
यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी , बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत साजरा होणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पूजन शनीवार दिनांक 14 जून 2025 रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक 6 वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत संपन्न झाला.
सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.