लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय
जय गणेश 🙏🏻 मराठवाड्यातील पुरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रुपये पन्नास लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सुपूर्द करताना मंडळाचे पदाधिकारी….🙏🏻🙏🏻🙏🏻
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झालेली असून शेतकऱ्यांचे अतीव नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील या अस्मानी संकटात अपद्ग्रस्त झालेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधे ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे.
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव
लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सव काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव गुरूवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर लालबाग मार्केट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घ्यावी.