AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 92 वे.
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय (डिजिटल लायब्ररी) उद्घाटन सोहळा. मंगळवार दि. 24 फेब्रुवार 2026 रोजी सायंकाळी 7:00 वाजता लालबागचा राजा प्रभोधिनी, मुन्सिपल शाळा, पेरूचाळ कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, मुंबई 400 012 येथे होणार आहे.
सदरचे उद्घाटन सोहळ्याचे ॲानलाईन थेट प्रसारण मंडळाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि मोबाईल अँप या समाजमाध्यमांवर पाहता येईल.
यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/live/5vdGUUx9j7w?feature=share
फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
ट्विटर (X) अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja
वेबसाइट:
https://www.lalbaugcharaja.com
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय
स्थापना :१९३४ वर्ष:-९२ वे
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
लालबागचा राजा AI अंकीय ग्रंथालय
लालबागचा राजा AI डिजिटल लायब्ररी
ज्ञान तंत्रज्ञान आणि उज्वल भविष्याकडे नेणारे मंडळाचे एक महत्वपूर्ण पाऊल…
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे मंडळाने उभारले ज्ञानाचे व्यासपीठ…
विद्यार्थी मित्रहो ज्ञानाच्या विश्वात ,
या…समजून घ्या आणि प्रगती करा…..

मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून,
रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल सेट आणि शाळेची – कॉलेजची बॅग या वस्तूंचा अंतर्भाव असलेला संच मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावातील म्हणजेच,
माढा , रयत शिक्षण संस्था, उंदरगाव, दारफाल, केडाव, मानेगाव, सुलतानपूर, महतपूर, वाकाव, निमगाव, केराव ही आपदग्रस्त गावे आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर, सौंदना,हलद गाव ,शेलगांव, वानेवाडी इत्यादी गावांमधील हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा कडून मराठवाड्यातील पूरग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप.


English



































