(English) Live Stream for Lalbaugcha Raja 2023

Aarti Video Playlist 2023​

Photo Gallery - Utsav 2023​

लालबागचा राजाला अयोध्येतून बोलावणे

लालबागचा राजाला अयोध्येतून बोलावणे
अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 ला होणार आहे. याचे विशेष निमंत्रण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक श्री. रवींद्रभाई संघवी व अन्य पदाधिकाऱ्यांनी मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कांबळे, मानद सचिव श्री सुधीर साळवी आणि खजिनदार श्री मंगेश दळवी यांची लालबाग येथील मंडळाच्या कार्यालयात भेट घेतली व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. हा क्षण सर्वांसाठी मोलाचा आणि आनंदाचा आहे. प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीने यात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सहभागी करून घेतले याचा आनंद आहे. मंडळाचे अध्यक्ष या निमंत्रणाचा सन्मान राखत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्याकडे रवाना झाले आहेत.

24 नोव्हेंबर जागतिक ऐच्छिक रक्तदाता दिन

मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था, *बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून* 24 नोव्हेंबर या *जागतिक ऐच्छिक रक्तदाता दिनाचे* औचित्य साधून मुंबई व महाराष्ट्र राज्य पातळीवर विविध प्रतिकूल परिस्थितीत आणि अत्यावश्यक गरजेप्रसंगी रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे महत्कार्य केल्याबद्दल *लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास* गौरवपुरस्कार देऊन सन्मानित करताना सायन येथील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलचे सन्माननीय *डीन डॉ.श्री.मोहन जोशी* तसेच मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे सन्माननीय *संचालक डॉ.श्री. विजयकुमार करंजकर.*
सदर गौरवपुरस्कार मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि उपमानदसचिव संजय मधुकर धुमक यांनी स्विकारला. #lalbaugcharaja

लालबागचा राजा चरणस्पर्श रांग आणि मुख दर्शन रांग बंद होणार आहे

लालबागचा राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता बुधवार दि. 27-09-2023 रोजी चरणस्पर्शाची रांग सकाळी 6:00 वाजता व मुखदर्शनाची रांग रात्री 12:00 वाजता बंद करण्यात येईल.