आपतकालिन सेवा
लालबागाच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आपतकालिन सेवा.
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील ईर्शाळवाडीतील आपदग्रस्त नागरिकांच्या मदतीला…लालबागचा राजा निघाला…
आपत्तीग्रस्तं ईर्शाळवाडीतील ग्रामस्थांच्या मदतीला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जिवनाश्यक पदार्थ, वस्तू आणि कपड्यांची मदत.
ईर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जीवीत हानी झाली आहे. तसेच अनेक जख्मींवर उपचार देखील सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेत जख्मी आणि वाचलेल्या ग्रामस्थांसाठी लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आज मोठी मदत घेऊन निघाले आहेत. दोन मोठे टेम्पो मधून ही मदत पोहचवली जाणार आहे. ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ तसेच विविध अन्नपदार्थ , ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जिवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे. आज शुक्रवार दिनांक २१ जुलै २०२३ सकाळी 10 वाजता ही मदत घेऊन लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून ईर्शाळवाडीकडे मंडळाचे कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
मंडप पूजन
लालबागच्या राजाचे
मंडप पूजन संपन्न
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागचा राजाच्या ९० व्या वर्षातील गणेशोत्सवाचे मंडप पूजन मंगळवार दिनांक ०४ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता संपन्न झाले.
जागतिक योग दिन
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संचालित महिला व पुरूष योग केंद्राच्या विद्यमाने जागतिक योग दिना निमित्त, बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी ठीक सात वाजता *जागतिक योग दिन कार्यक्रम* संपन्न झाला.
सदर योग दिन प्रसंगी पुरूष आणि महिला योगसाधकांनी आरोग्यवर्धक योगासनांची सहजसुंदर प्रात्यक्षिके सादर केली.
लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन २०२३
“लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न”
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार दि. ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः०० वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्स च्या चित्रशाळेत पार पडले. तदप्रसंगी खजिनदार श्री. मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.