मराठवाड्यातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून,
रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठवाड्यातील सोलापूर जिल्ह्यातील, माढा तालुक्यातील पुरग्रस्त गावां मधील शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संच ज्यात, सर्व इयत्तेची अर्थात इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, वह्या, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास बॉक्स, पेन सेट, पेंसिल सेट आणि शाळेची – कॉलेजची बॅग या वस्तूंचा अंतर्भाव असलेला संच मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अतिवृष्टग्रस्त गावातील म्हणजेच,
माढा , रयत शिक्षण संस्था, उंदरगाव, दारफाल, केडाव, मानेगाव, सुलतानपूर, महतपूर, वाकाव, निमगाव, केराव ही आपदग्रस्त गावे आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकूर, सौंदना,हलद गाव ,शेलगांव, वानेवाडी इत्यादी गावांमधील हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.