मंडप पूजन

लालबागच्या राजाचे
मंडप पूजन संपन्न
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागचा राजाच्या ९० व्या वर्षातील गणेशोत्सवाचे मंडप पूजन मंगळवार दिनांक ०४ जुलै २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता संपन्न झाले.

जागतिक योग दिन

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संचालित महिला व पुरूष योग केंद्राच्या विद्यमाने जागतिक योग दिना निमित्त, बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी सकाळी ठीक सात वाजता *जागतिक योग दिन कार्यक्रम* संपन्न झाला.
सदर योग दिन प्रसंगी पुरूष आणि महिला योगसाधकांनी आरोग्यवर्धक योगासनांची सहजसुंदर प्रात्यक्षिके सादर केली.

 

Lalbaug cha raja paul pujan poojan

लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन २०२३

“लालबागच्या राजाचे गणेश मुहूर्त पूजन संपन्न”
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९० व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थी बुधवार दि. ०७ जून २०२३ रोजी सकाळी ६ः०० वा. मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्स चे श्री. रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्स च्या चित्रशाळेत पार पडले. तदप्रसंगी खजिनदार श्री. मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकाचे पूजन केले.

लालबागचा राजा गणेशोत्सव २०२२

बुधवार दि. ३१ ॲागस्ट २०२२ रोजी सकाळी ५.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्‌नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव २०२२ चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल २०२२ चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी ६ः०० नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल.
लालबागचा राजा चे ॲानलाईन दर्शन भाविकासाठी बुधवार दि. ३१ ॲागस्ट २०२२ रोजी पहाटे ०५:०० वाजल्यापासून ते शुक्रवार दि. ९ सप्टेंबर २०२२ अनंत चतुर्दशी (विसर्जना) पर्यंत २४ तास चालु राहिल.

लालबागचा राजा २०२२ चे ॲानलाईन दर्शनाचे थेट प्रसारण भाविकासाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर पाहता येईल.
वेबसाइट:
https://lalbaugcharaja.com/
यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/user/LalbaugRaja
फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
ट्विटर अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja