लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९१ वे
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ९१ वे
सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते मंगळवार 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत साजरा करत आहे…
त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागचा राजाचे, प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन आज गुरुवार दिनांक
5 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी ठिक 7 वाजता आयोजीत करण्यात आले आहे.
प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी यांची नोंद घ्यावी.
— सुधीर सिताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
लालबागचा राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, IOS आणि Android App वर घेता येईल.
यूट्यूब चॅनल:
वेबसाईटः https://lalbaugcharaja.com//MR/
फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja
इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
ट्विटर अकाऊंट:
Tweets by LalbaugchaRaja
Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja
श्री अनंत अंबानी यांची मंडळाच्या मानद सल्लागार सदस्यपदी नियुक्ती
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कळविण्यात येते की माननीय श्री. अनंत अंबानी यांची मंडळाचे मानद सल्लागार सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लालबागच्या राजाचे मंडप पूजन 2024
लालबागच्या राजाचे मंडप पूजन संपन्न
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागचा राजाच्या ९१ व्या वर्षातील गणेशोत्सवाचे मंडप पूजन मंगळवार दिनांक ०२ जुलै २०२४ रोजी लालबाग मार्केट येथे सकाळी ठीक ११ वाजता संपन्न झाले.
#lalbaugcharaja

“श्री गणेश मुहूर्त पूजन”
लालबागच्या राजाचे “श्री गणेश मुहूर्त पूजन” संपन्न
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवार दिनांक ११ जून २०२४ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले.तद्प्रसंगी खजिनदार श्री.मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.
#lalbaugcharaja


English












