आरोग्योत्सव २०२०

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

आयोजित,
आरोग्योत्सव अंतर्गत रक्तदान शिबीराचे उदघाटन शनिवार दि. २२ ॲागस्ट २०२० रोजी सकाळी ६.३० वाजता दिप प्रज्वलन करून होईल. तदनंतर लालबागचा राजा चा वार्षिक अहवाल २०२० चे प्रकाशन करण्यात येईल.
सकाळी ठीक ७.०० वा. पासुन रक्तदान शिबीरास सुरूवात होईल.
रक्तदान शिबीर शनिवार दि. २२ ॲागस्ट ते सोमवार दि. ३१ ॲागस्ट २०२० रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत चालु राहिल.
ज्या रक्तदात्यांना या रक्तदान शिबीरात सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
संतोष गुरव ८१६९६६१०८३
प्रशांत विचारे ८४५४९१९९१२
विनायक नाणारकर ९७७३२५३८८१
संजय दळवी ९७७३७९९१२४
सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत साईट वर करण्यात येईल.
मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
http://bit.ly/2uHKCz2

मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://www.youtube.com/user/LalbaugRaja/live
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
facebook.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
instagram.com/lalbaugcharaja

 

 

मागिल वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव साजरा केला.
यावर्षी मात्र मंडळाने कोरोनाची सध्याची एकंदर परिस्थिती पाहता करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा उत्सव महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दि. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे. या उत्सवकाळात सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून घेता येईल.
सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत साईट वर करण्यात येईल.
मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
http://bit.ly/2uHKCz2
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://www.youtube.com/user/LalbaugRaja/live
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
facebook.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
instagram.com/lalbaugcharaja
#lalbaugcharaja

लालबागचा राजा डायलिसिस सेंटर….
अनेक डायलिसिसरूग्णांसाठी आश्वासक आणि विश्वासार्ह असे जीवनदायी सेंटर…
कोविड महामारीच्या काळात जेव्हा सर्व डायलिसिस सेंटर बंद होत होते तेव्हा शेकडो डायलिसिस रुग्णांसाठी भक्कमपणे आधार देऊन दिवसरात्र अविरत व अविश्रांत सेवा पुरवित होते ते फक्त आणि फक्त लालबागचा राजा डायलिसिस सेंटर….

श्रीमान राजीव निवतकर.IAS.
जिल्हाधिकारी
मुंबई शहर.
मंडळाच्या लालबागचा राजा डायलिसिस सेंटरला महाराष्ट्र शासनाकडून *प्रशंसापत्रक*

 

‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’

नमस्कार,

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितकारी निर्णय घेतला. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्तं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आरोग्योत्सवाचे ऊद् घाटन हिंदुस्तानचे ज्येष्ठनेते मा. श्री. शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते.

जीवदान ठरू शकणा-या या आरोग्योत्सव अंतर्गत मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२० पासून प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्लाझ्मादान शिबिरामध्ये आतापर्यंत एकूण २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केले आहे.

तसेच दि. २२ ऑगस्ट २०२० पासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात दि. ३० ऑगस्ट २०२० पर्यंत एकूण ‘१०२७६’ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

दि. १५ जून २०२० रोजी हिंदुस्तान व चीन सीमेवर चिनीशत्रूशी लढताना गलवान खोर्यात हिंदुस्तानचे २२ वीर जवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये दोन लाख प्रदान करण्यात आले.

कोविड काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र व मुंबईतील १११ पोलिसबांधव शहीद झाले.त्यापैकी आतापर्यंत एकूण १०१ शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित
करण्यात आले आहे.

कोविड काळातील अनेक कोविड सेनानींचा सन्मान या आरोग्योत्सव काळात करण्यात आला आहे.

मुंबई महाराष्ट्रात कोरोनाच्या घातक प्रादुर्भावाच्या काळात दि. २३ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० या कालावधीत माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच दि. ४ मे २०२० ते ४ जून २०२० या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण विभागात आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळजवळ २९ हजार नागरीकांची आरोग्य तपासणी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले होते.

सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी २४६ प्लाझ्मादात्यांवर नगरविकास मंत्री मा.नामदार श्री.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पवृष्टी करून या आरोग्योत्सवील प्लाझ्मादान शिबिराचा समारोप करण्यात आला.. 🙏

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या

लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार. सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. 🙏

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने सुरू असलेल्या आरोग्योत्सव अंतर्गत रक्तदान शिबीरास रक्तदाते प्रचंड प्रतिसाद देत आहेत.
दि. २२ ऑगस्टला ४४४,
दि. २३ ऑगस्टला ९३०,
दि. २४ ऑगस्टला ८१५,
दि. २५ ऑगस्टला ९३४,
दि. २६ ऑगस्टला ८६०,
दि. २७ ऑगस्टला ८०२,
दि. २८ ऑगस्टला ७४४,
दि. २९ ऑगस्टला १३०३,
दि. ३० ऑगस्टला १७७९
रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दि. २२ ऑगस्ट ते दि. ३० ऑगस्ट २०२० पर्यंत एकुण ८,६११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
‘सर्व रक्तदात्यांचे हार्दिक आभार’. 🙏

लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित व के. ई. एम्. रूग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ॲागस्ट ते ३१ ॲागस्ट २०२० पर्यंत २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केले.

आज ३१ ॲागस्ट २०२० महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सर्व प्लाझ्मादात्यांना तसेच मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलातील शहीदांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आले.

सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. 🙏

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

या वर्षीचा गणेशोत्सव देशहितासाठी

या वर्षी सन २०२० लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांसाठी सदर वर्षी गणेशोत्सव काळात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘आरोग्य उत्सव’ साजरा करणार आहे.
गणेशोत्सव काळात दहा दिवसात महारक्तदान शिबिर घेणार. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोना बाधित रुग्णांसाठी मुंबई महानगर पालीकेच्या सहकार्याने प्लाझमा डोनेशन उपक्रम राबविणार.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रूपयांची मदत.
करोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवताना आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिस कर्मचा-यांच्या कुटुंबियांचा सन्मान.
गलवान खो-यात चीनच्या सीमेवर चीनी सैनिकांशी लढताना हिंदुस्थानची सीमा सुरक्षित ठेवताना देशासाठी वीरमरण येऊन शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान.

[ngg src=”galleries” ids=”65″ display=”basic_slideshow”]

 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितनिर्णय घेतला आहे. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या, लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवदान देणा-या या ‘आरोग्योत्सव’ आणि ‘प्लाझ्मादान’ शिबिराचे ऊद्घाटन सोहळा जेष्ठ नेते सन्माननीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते सोमवार दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता लालबागचा राजा मार्ग, लालबाग मार्केट, मुंबई – ४०० ०१२ या ठीकाणी संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
मंडळाच्या अधिकृत साईट वर करण्यात येईल.
मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
http://www.lalbaugcharaja.com
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://www.youtube.com/user/LalbaugRaja/live
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
facebook.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
instagram.com/lalbaugcharaja

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित व के. ई. एम्. रूग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लाझ्मादान नोंदणी दि. ३ ॲागस्ट ते ३१ ॲागस्ट २०२० रोज सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० पर्यंत लालबागचा राजा योग केंद्रात केली जाईल.

नवे आणि कल्पक रूप
(महाराष्ट्र टाईम्स-२/७/२०२०)

दर वर्षी आषाढात अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात होते. या शुभारंभाचा सोहळाही होतो. यंदा सारे गणितच बदलले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले.

नवे आणि कल्पक रूपनवे आणि कल्पक रूप
आषाढी एकादशीला सुरू होणारे सण, उत्सव आणि यात्रांचे दिवस थेट दिवाळीपर्यंत चालू राहतात. यंदा करोनाकहराने जगण्याचे आयामच बदलून गेले आहेत. मग त्यापासून उत्सव तरी वेगळे कसे राहणार? दर वर्षी लाखो भाविकांनी ओसंडून वाहणारी पंढरी जशी यंदा भक्तांविना ओस पडली, तशीच स्थिती गणेशोत्सवात महाराष्ट्रभर दिसेल. दर वर्षी आषाढात अनेक गणेश मंडळांच्या मूर्ती साकारण्यास सुरुवात होते. या शुभारंभाचा सोहळाही होतो. यंदा सारे गणितच बदलले आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले. त्याला मंडळांनी तत्काळ प्रतिसाद दिला. मुंबई-ठाण्यात व पुण्यात मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर भव्य व विशाल मूर्तींसाठी विख्यात असणाऱ्या बहुतेक मंडळांनी मूर्तींची उंची कमी करून, ती तीन, साडेतीन, चार फूट इतकीच मर्यादित ठेवण्याचे ठरविले. ‘लालबागच्या राजा’ने तर एक पाऊल पुढे टाकत, यंदा गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायची नाही आणि त्याऐवजी दहा दिवस ‘आरोग्यउत्सव’ करण्याचे ठरविले आहे. हा निर्णय स्वागतार्हच नव्हे, तर अनुकरणीयही आहे.
महाराष्ट्रभर या निर्णयाचे पडसाद उमटतील. मंडळाने या निर्णयाचे ‘देश हा देव असे माझा’ अशा अत्यंत अचूक शब्दांत वर्णन केले आहे. हे दहा दिवस रक्तदान, प्लाझ्मादान, गलवानच्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना साह्य, करोनावीर पोलिसांच्या कुटुंबांना साह्य अशा उपक्रमांनी गणेशोत्सव होणार आहे. महाराष्ट्रातली गणेशोत्सव मंडळे याआधीच करोनाच्या लढाईत उतरली असून, ठिकठिकाणी कामाला जुंपली आहेत. ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ने केलेल्या आवाहनानंतर लाखो रुपयांच्या देणग्या मुख्यमंत्री निधीमध्ये जमा झाल्याच; पण अनेक मंडळांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या भागांत कामांची जबाबदारी स्वीकारली. ती कामे आजही चालू आहेत.
करोनाने झडप घातली तेव्हा ही साथ दोन-तीन महिन्यांत आटोक्यात येईल आणि मग गणेशोत्सव, दहिहंडी, नवरात्र, दिवाळी हे सगळे चढत्या उत्साहाने साजरे होणारे सण, उत्सव पार पडतील, अशी आशा होती. आताचे चित्र मात्र भयावह असून, या वर्षी अगदी थेट नाताळपर्यंत कोणताही सण किंवा उत्सव दरवर्षीसारखा साजरा करता येणार नाही, याची स्पष्ट खूणगाठ मनाशी बांधण्याची गरज आहे. भारतीय समाज कितीही उत्सवप्रिय असला, तरी उत्सव म्हणजे ‘जनांचा प्रवाहो’ आणि करोनामध्ये माणसांनी माणसांपासून सदैव जास्तीत जास्त अंतर व कडक शिस्त राखण्याची निकड.
अशा वेळी, सगळीच उत्सवी मंडळे, कार्यकर्ते, त्यांचे नेते, मार्गदर्शक आणि सामान्य नागरिक यांनी समाजहिताची व दूरदृष्टीची भूमिका घेतली नसती, तर आजवरचा सगळा करोनालढा अयशस्वी ठरण्याची मोठी भीती होती. सुदैवाने, राज्यभरातील सगळीच गणेशोत्सव मंडळे या गंभीर परिस्थितीला उचित आणि पोक्त प्रतिसाद देत आहेत. हाच क्रम पुढे दहिहंडी व नवरात्र मंडळेही चालवतील, अशी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव समन्वय समितीने श्रींचे आगमन, पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विसर्जन या बाबतीत जी सविस्तर नियमावली जाहीर केली, तिचे पालन राज्यातील सगळी मंडळे करतील, यात शंका नाही.

मंडळांना सामाजिक कामासाठीही आवाहन करण्यात आले आहे. तसे काम बरीच मंडळे करीत आहेत. गेल्या शतकात प्लेगच्या साथीत महाराष्ट्रात कसा साधा व मर्यादित स्वरूपाचा उत्सव झाला होता, याच्या आठवणी जागविल्या जात आहेत. त्या बरोबर असल्या, तरी तेव्हाचा उत्सवांचा आवाका आणि आजचा विस्तार यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.
राज्यातल्या सर्व मोठ्या मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरविल्यामुळे काही समस्याही निर्माण होणार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सव हा काही हजार कोटी रुपयांची उलाढाल होणारा अवाढव्य व्याप बनला आहे. मंडपापासून सजावटीपर्यंत, लायटिंगपासून प्रसादापर्यंत, ढोलताशांपासून फूल-फळवाल्यांपर्यंत राज्यात लाखो रोजगार निर्माण होतात. हजारो कंत्राटे दिली-घेतली जातात. या प्रचंड उलाढालीत दर वर्षी गुंतणाऱ्या लाखो श्रमजीवींसाठी ठोस काही काम करता येईल का, याचाही विचार मंडळांनी व त्यांच्या मार्गदर्शकांनी करायला हवा.
पुढचे सारे उत्सव नेहमीसारखे झाले नाहीत, तर हा रोजगाराचा प्रश्न वर्ष संपेपर्यंत असाच चालू राहणार आहे. त्याबाबत नेमके काय करता येईल, याचा विचार मंडळांनी करावा. दुसरे म्हणजे, आज महामुंबईचा चार जिल्ह्यांचा परिसर, तसेच पुण्याचा सारा भाग यांना करोना दिवसेंदिवस अधिक ग्रासतो आहे. अशा वेळी, सगळ्या सार्वजनिक उत्सव मंडळांची शिस्तशीर व नेटकी बांधणी अधिक उपयोगी पडणारी आहे. सध्या सगळी मंडळे आपापल्या ताकदीनुसार काम करीत आहेत. धावून जात आहेत.
आता आपल्याला साऱ्या उत्सवाचा रोख समाजावरील संकटाकडे वळवायचा असल्याने, या कामांमध्ये अधिक सुसूत्रता आणि नेमकेपणा आणता येईल का, याचा विचार अग्रक्रमाने होण्याची गरज आहे. राज्य सरकारने यासाठी वेगळी समन्वय यंत्रणा लवकरात लवकर तयार करून, राज्यातल्या सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांना या लढाईत कसे सामावून घेता येईल, याची आखणी करायला हवी. मिरवणूक काढायची नाही, वर्गणी घ्यायची नाही, हे निर्णय योग्य आहेत. मुंबईत गणेशोत्सव समन्वय समितीने ‘कोव्हिड कृतिदल’ स्थापण्याची कल्पना मांडली. काळाचौकी व इतर काही मंडळांनी अशी कृतिदले स्थापन केली. अशी कृतिदले राज्यभर वेगाने स्थापून, त्या सगळ्यांचा सरकारी यंत्रणांशी समन्वय साधता आला, तर जगात कुठेही झाले नाहीत, असे ‘सेवा उत्सव’ आपण साजरे करू शकू. गणेशोत्सवाचा आजचा खरा भक्तिमार्ग तोच आहे.

 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आयोजित..

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने “जनता क्लिनीक” अंतर्गत थर्मल स्कॅनर व ऑक्सिजन व्हॅन द्वारे मंगळवार दि.५ मे २०२० पासून सातत्याने लालबाग ,परळ, शिवडी, चिंचपोकळी, काळाचौकी, दादर, भोईवाडा, नायगाव इ.परिसरातील नागरिकांची कोरोना पार्श्वभूमीवर मोफत वैद्यकीय तपासणी तसेच ऊपयुक्त औषधे वाटप आणि समुपदेशन करण्यात येत आहे…
या ऊपक्रमाची चित्रफित…
(सदरची चित्रफित ही मंगळवार दि. ५ मे २०२० पासून ते शुक्रवार दि.१५ मे २०२० पर्यंतची असून मोफत आरोग्यशिबिरे यापुढेही अजून असेच चालू राहतील.)
#IndiaFightsCorona



आज सोमवार दि. ४ मे २०२० सायंकाळी ठीक ५.०० वाजता मंडळाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणाऱ्या जनता क्लिनीक अंतर्गत थर्मल स्कॅनर व ऑक्सिजन व्हॅनचे ऊद्घाटन मुंबई शहराच्या सन्माननीय महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या शुभहस्ते, लालबागचा राजा मार्ग, लालबाग मार्केट, मुंबई ४०० ०१२ या ठिकाणी होणार आहे….
सदर जनता क्लिनिक बृहन्मुंबई महानगर पालिका आणि WHO मान्यताप्राप्त संस्था बी मुंबईकर यांच्या सहकार्याने लालबागचा राजा मंडळाच्या विद्यमाने चालविण्यात येणार आहे…. सदर क्लिनिकमध्ये रूग्णांसाठी आवश्यक असे वैद्यकीय ऊपकरणे असून सदर व्हॅन ही सध्याच्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेले थर्मल स्कॅनर व ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमीटर आणि इतर अत्याधुनिक वैद्यकिय ऊपकरणांनी सुसज्ज अशी व्हॅन असून यामध्ये बृहन्मुंबई म.न.पा. चे डाॅक्टर्स व WHO मान्यताप्राप्त संस्थेचे तज्ञ डाॅक्टर्स ….ज्या ठिकाणी संशयित कोरोना बाधित रूग्ण असतील त्या ठिकाणी जाऊन त्या रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांचे अनुरूप समुपदेशन करून तसेच योग्य औषधे पुरवून त्यांची शुश्रुषा करणार आहे…
सदर जनता क्लिनिकसाठी जागतिक
आरोग्य संघटनेची मान्यताप्राप्त असलेले बी मुंबईकर या संस्थेचे डाॅ. कृष्णाचंद्र तसेच मंडळाचे हितचिंतक डाॅ. प्रागजी वाजा आणि मुंबई म.न.पा. एफ-साऊथ विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीमती इनामदार मॅडम यांचे विशेष सहकार्य असणार आहे.
अधिक माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
http://bit.ly/2uHKCz2
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://www.youtube.com/user/LalbaugRaja/featured
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
instagram.com/lalbaugcharaja

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रक्तदान शिबिर सोमवार दि. २३/०३/२०२० रोजी सुरू केले होते, त्याचा आज बुधवार दि. १/०४/२०२० रोजी सांगता सोहळा संपन्न झाला. या देश हिताच्या कार्यात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे आम्ही आभारी आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान. श्री. राजेशजी टोपे, गृहमंत्री मान. श्री अनिलजी देशमुख, मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर, विभागिय खासदार मा. श्री. अरविंदजी सावंत… आमदार मा. श्री. अजयजी चौधरी… नगरसेवक मा. श्री. अनिलजी कोकीळ, मुंबई शहर आणि काळाचौकी विभाग पोलिस कर्मचारीवर्ग, बृहन्मुंबई महानगर पालिका आणि एफ् दक्षिण विभाग कर्मचारी वर्ग, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद कर्मचारी वर्ग, BEST प्रशासन , सर्व वैद्यकीय कर्मचारी वर्ग, सर्व विभागीय मंडळं, सफाई कर्मचारी बांधव आणि डाॅ. प्रागजी वाजा व डाॅ. अनिल आव्हाड या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानत आहोत. या दहा दिवसांच्या रक्तदान शिबिरात एकुण १,५८५ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. त्या सर्व रक्तदात्यांचे पुनश्चः एकदा आभार..!
ज्या ज्या वेळेस देशावर कोणतेही संकट येते त्या त्या वेळेला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमी तत्परतेने देशसेवेसाठी हजर असते… भविष्यातदेखिल ही सामाजिक जबाबदारी आम्ही अशीच स्विकारत राहू,
असे मंडळाचे मानद सचिव श्री सुधीर साळवी ह्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रक्तदान शिबिरा बाबत केलेल्या कार्याचा गौरव केल्याबद्दल आम्ही आभारी आहेत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. श्री. उध्दवजी ठाकरे व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान. श्री. राजेशजी टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने आज दि. २३ मार्च २०२० सकाळी ९.०० वा. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान. श्री. राजेशजी टोपे यांच्या हस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित सुरक्षित व हायजेनिक रक्तदान शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. हे शिबीर दि. २३ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० पर्यंत सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत आयोजित केले आहे.
ज्या व्यक्तिंना रक्तदान करावयाचे असेल त्यांनी ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ७७३८३६९४९५, ९७७३२९१५०२, ९७५७०१८४१९ आणि तारीख व वेळ आरक्षित करावा. या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या उदात्त कार्यास अनमोल सहकार्य करावे आणि आपण सारेच जण करोनाच्या या लढाईत रक्तदानाचे पवित्र कार्य करूया असे आवाहन मंडळाचे मानद्सचिव श्री. सुधीर साळवी यांनी केले आहे. रक्तदान शिबीराबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.
https://tinyurl.com/lalbaug-bloodcamp

महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान. श्री. राजेशजी टोपे यांचे नागरिकांस आवाहन –


[ngg src=”galleries” ids=”63″ exclusions=”2797″ sortorder=”2797,2796,2795,2794,2793,2792,2791,2790,2789,2788,2787,2786,2785,2784,2783,2782″ display=”basic_thumbnail” thumbnail_crop=”0″]

Blood donation drive

India Fights Corona
India Fights Corona