लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…!

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका तसेच सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल यांच्या सहकार्याने आज बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळ ५ वाजेपर्यंत लालबागचा राजा प्रबोधिनी येथे मोफत कोवॅक्सिन लसीकरण मोहीम चालू केली आहे.

लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८ वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ ते रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. आज मंगळवार दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ठीक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला व खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.

‘कोविड १९ संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाऊल पूजन सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाऊल पूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते यंदा मात्र कोविड १९ ससंर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाची.’