लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने मंडळाचे कार्यकारी मंडळ शुक्रवार दिनांक १३ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ठीक ११:३० वाजता महाड, पोलादपूर, चिपळूण तसेच कोल्हापूर सातारा, सांगली येथिल पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी एकुण १०,००० कुटुबांना जीवनावश्यक गृहउपयोगी वस्तू आणि पदार्थ वितरीत करण्यासाठी सात ट्रक घेऊन निघाले होते. याद्वारे राष्ट्रीय आपत्ती निवारण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे कर्तव्य मंडळाने पार पाडण्याचे ठरविले. देशावर वा मुंबई – महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आली आहे, तेव्हा तेव्हा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी कर्तव्यतत्पर भावनेने प्रत्येकवेळी धावलेले आहे.

शुक्रवार दि.१३ ऑगस्टपासून शनिवार दिनांक १४ ऑगस्ट २०२१ या कालावधीत मंडळाने कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील कुरंदवाड- चिलखी- मोळी आळी -दत्त मंदीर- शिकलगार वसाहत -बहिरेवाडी- गोठणपूर -बागडीगल्ली- कुरूंदवाड फायरब्रिगेड व सफाई कर्मचारी बांधव- शिरोळ -कवठेगुलंद- अलास- बुबनाळ- औरवाड -गणेशवाडी- गौरवाड -शेडशाळ आणि नृसिंह वाडी तसेच महाड व चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते- खेर्डी- मुरादपूर- सती चिंचघरी -दळवटणे- कोळकेवाडी -पिंपळीखुर्द- कुटेरे- येगाव -कोसबी- तळवडे- जाडे आळी- पोसरे -पागमळा- बालोपे -तसेच जुई- चोचिंदे -सव -कोसबी- सावरतळा- वामणी -गोटे बुद्रुक -शिरगाव- वेताळवाडी- तळेकरवाडी- पोलादपूर- तसेच पाटण तालुक्यातील आंबेघर -शिद्रुकवाडी- सातेवाडी- नाटोशी -किल्ले मोरगिरी -कोळेवाडी- जातेघर या सर्व गावात आपाद्ग्रस्त नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

लालबागचा राजाचा वस्तूरूपी प्रसाद आणि आशिर्वाद या नागरिकांना मिळावा या तन्मयतेने मंडळाने हे विधायक काम केले.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८८ वे वर्ष…!

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका तसेच सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल यांच्या सहकार्याने आज बुधवार दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळ ५ वाजेपर्यंत लालबागचा राजा प्रबोधिनी येथे मोफत कोवॅक्सिन लसीकरण मोहीम चालू केली आहे.

लालबागच्या राजाचा यावर्षीचा ८८ वा गणेशोत्सव यंदा मंडळातर्फे शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ ते रविवार दि. १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणार आहे. आज मंगळवार दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ठीक सहा वाजता लालबागच्या राजाचा गणेश मुहूर्त पूजन अर्थात पाद्यपूजन सोहळा अत्यंत मांगल्यमय आणि पावित्र्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला व खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाच्या या गणेशोत्सवाला आजपासूनच सुरुवात झालेली आहे.

‘कोविड १९ संसर्ग निर्बंधांमुळे अत्यंत साधेपणाने आणि सुरक्षितपणे हा पाऊल पूजन सोहळा पार पडला. लालबागच्या राज्याच्या दर्शनाला होणारी गर्दी पहाता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पाऊल पूजन सोहळा जाहीर न करता हा सोहळा केला. त्यामुळे गणेशभक्तांची होणारी गर्दी टाळता आली. दरवर्षी लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनालाही गणेशभक्तांची मोठी गर्दी होते यंदा मात्र कोविड १९ ससंर्ग निर्बंध नियमांमुळे मंडळाने गर्दी टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली होती. आता सर्व गणेशभक्तांना वेध लागलेत ते लालबागच्या राजाच्या स्थापनेची आणि दर्शनाची.’