रक्तदान शिबिर
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रक्तदान शिबिर सोमवार दि. २३/०३/२०२० रोजी सुरू केले होते, त्याचा आज बुधवार दि. १/०४/२०२० रोजी सांगता सोहळा संपन्न झाला. या देश हिताच्या कार्यात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे आम्ही आभारी आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्रीx श्री. उद्धवजी ठाकरे, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान. श्री. राजेशजी टोपे, गृहमंत्री मान. श्री अनिलजी देशमुख, मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर, विभागिय खासदार मा. श्री. अरविंदजी सावंत… आमदार मा. श्री. अजयजी चौधरी… नगरसेवक मा. श्री. अनिलजी कोकीळ, मुंबई शहर आणि काळाचौकी विभाग पोलिस कर्मचारीवर्ग, बृहन्मुंबई महानगर पालिका आणि एफ् दक्षिण विभाग कर्मचारी वर्ग, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद कर्मचारी वर्ग, BEST प्रशासन , सर्व वैद्यकीय कर्मचारी वर्ग, सर्व विभागीय मंडळं, सफाई कर्मचारी बांधव आणि डाॅ. प्रागजी वाजा व डाॅ. अनिल आव्हाड या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानत आहोत. या दहा दिवसांच्या रक्तदान शिबिरात एकुण १,५८५ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. त्या सर्व रक्तदात्यांचे पुनश्चः एकदा आभार..!
ज्या ज्या वेळेस देशावर कोणतेही संकट येते त्या त्या वेळेला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमी तत्परतेने देशसेवेसाठी हजर असते… भविष्यातदेखिल ही सामाजिक जबाबदारी आम्ही अशीच स्विकारत राहू,
असे मंडळाचे मानद सचिव श्री सुधीर साळवी ह्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित रक्तदान शिबिरा बाबत केलेल्या कार्याचा गौरव केल्याबद्दल आम्ही आभारी आहेत.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. श्री. उध्दवजी ठाकरे व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान. श्री. राजेशजी टोपे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने आज दि. २३ मार्च २०२० सकाळी ९.०० वा. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान. श्री. राजेशजी टोपे यांच्या हस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित सुरक्षित व हायजेनिक रक्तदान शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. हे शिबीर दि. २३ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० पर्यंत सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत आयोजित केले आहे.
ज्या व्यक्तिंना रक्तदान करावयाचे असेल त्यांनी ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ७७३८३६९४९५, ९७७३२९१५०२, ९७५७०१८४१९ आणि तारीख व वेळ आरक्षित करावा. या रक्तदान शिबिरात रक्तदान करून या उदात्त कार्यास अनमोल सहकार्य करावे आणि आपण सारेच जण करोनाच्या या लढाईत रक्तदानाचे पवित्र कार्य करूया असे आवाहन मंडळाचे मानद्सचिव श्री. सुधीर साळवी यांनी केले आहे. रक्तदान शिबीराबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा.
https://tinyurl.com/lalbaug-bloodcamp
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मान. श्री. राजेशजी टोपे यांचे नागरिकांस आवाहन –
लालबागचा राजा च चरणस्पर्श
लालबागचा राजा ची चरणस्पर्शाची रांग बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०६.०० वाजता बंद करण्यात येईल.
लालबागचा राजा ची मुखदर्शनाची रांग बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रात्रौ १२.०० वाजता बंद करण्यात येईल.
IMPORTANT NOTICE for Devotees :
LALBAUGCHA RAJA CHARAN SPARSH (TOUCH THE FEET) Darshan will be closed on Wednesday 11th September 2019, Morning 06.00 A.M.
LALBAUGCHA RAJA MUKH DARSHAN: Darshan will be closed on Wednesday 11th September 2019, Midnight 12.00 AM.
लालबागचा राजा उदघाटन सोहळा २०१९
सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ४.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव २०१९ चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल २०१९ चे प्रकाशन करण्यात येईल. लालबागचा राजा चे लाईव्ह दर्शन मंडळाच्या अधिकृत फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट व ट्विटर वर चालू राहील.
सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ४.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव २०१९ चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल २०१९ चे प्रकाशन करण्यात येईल. लालबागचा राजा चे लाईव्ह दर्शन मंडळाच्या अधिकृत फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट व ट्विटर वर चालू राहील.
अधिक माहिती अधिक माहितीलालबागचा राजा चे दर्शन भाविकासाठी सोमवार दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते बुधवार दि. ११ सप्टेंबर २०१९ रात्रौ १२.०० वाजेपर्यंत चालु राहिल. अधिक माहिती साठी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
लालबागचा राजा चे लाईव्ह दर्शन मंडळाच्या अधिकृत फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट व ट्विटर वर २४ तास चालू राहील.
‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणार्या पुनर्वसानासाठी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता नीधीला दिले. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.’
‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणार्या पुनर्वसानासाठी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता नीधीला दिले. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.
‘लालबागचा राजा चे प्रथम दर्शन
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्या क्षणाची सर्व भाविक आतुरतेने वाट पहात आहेत त्या लालबागचा राजा चे प्रथम दर्शन (मिडिया साठी फोटो सेशन) आज शुक्रवार दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता होणार आहे.
लालबागचा राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत Youtube, Facebook, Twitter आणि Website वर उपलब्ध असेल.