First Look of Lalbaugcha Raja 2026

?लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.?
??…वर्ष ९३ वे …??

जय गणेश ??

सालाबादप्रमाणे यंदाही भाद्रपद गणेशोत्सव लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोमवार दिनांक १४ सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोठ्या जल्लोषात साजरा करणार आहे.

या गणेशोत्सव सोहळ्यापूर्वी लालबागच्या राजाचे फोटो सेशन सर्व मिडीया प्रतिनिधींसाठी आयोजीत करण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ठिक ७ वाजता लालबाग मार्केटमध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘लालबागाचा राजा’ २०२६ चे प्रथम दर्शन घडविणार आहे.

सर्व मीडिया प्रतिनिधींना विनंती आहे…. मंडळाने नियोजीत केलेल्या ठिकाणावरून सर्वांनी फोटोशूट करावे तसेच मंडळाचे कार्यकर्ते आपल्या सर्वांना नियोजनासाठी सहकार्य करतील.

न्यूज कव्हरेजसाठी येणाऱ्या सर्व मीडिया प्रतिनिधींनी त्यांच्या न्यूज पेपर आणि न्यूज चॅनलचे प्रेस आय डी सोबत ठेवावे. प्रेस आयडी असलेल्या प्रतिनिधींनाच मीडिया स्टेजवर प्रवेश मिळेल.

बाळासाहेब कांबळे
अध्यक्ष, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

सुधीर सीताराम साळवी
मानद सचिव
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मंगेश दत्ताराम दळवी
खजिनदार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

लालबागच्या राजा चे प्रथम दर्शन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट, युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, IOS आणि Android App वर घेता येईल.

यूट्यूब चॅनल:
https://youtube.com/@lalbaugraja?si=Qe8pLceMlz66o6Nx

वेबसाईटः
https://lalbaugcharaja.com/MR/

फेसबुक पेज:
https://m.facebook.com/LalbaugchaRaja

इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja

X(ट्विटर) अकाऊंट:

Android and iOS App : Lalbaugcharaja

#lalbaugcharaja