लालबागचा राजाचा लाडु प्रसाद मुंबई-पुण्यासाठी JioMart वापरून ऑनलाइन ऑर्डर सुरू केली


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे या वर्षी चे हे ८८ वे वर्ष ! शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत या वर्षीचा गणेशोत्सव कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने साजरा होणारा आहे. या मध्ये प्रामुख्याने सर्व भाविकांचे दर्शन ॲानलाईन होणार आहे. लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा प्रसाद मंडळ ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ ॲपच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे.
यावर्षी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा चा लाडू प्रसाद ऑनलाईन पद्धतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपलब्ध करून देणार आहे.
हा लालबागच्या राजाचा प्रसाद दोन लाडुंच्या स्वरुपात असून त्याचे शुल्क रु.७०/- इतके सवलतीच्या दरात असणार आहे.

रक्तदान व प्लाझ्मादान

लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार. सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. ????

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने सुरू असलेल्या आरोग्योत्सव अंतर्गत रक्तदान शिबीरास रक्तदाते प्रचंड प्रतिसाद देत आहेत.
दि. २२ ऑगस्टला ४४४,
दि. २३ ऑगस्टला ९३०,
दि. २४ ऑगस्टला ८१५,
दि. २५ ऑगस्टला ९३४,
दि. २६ ऑगस्टला ८६०,
दि. २७ ऑगस्टला ८०२,
दि. २८ ऑगस्टला ७४४,
दि. २९ ऑगस्टला १३०३,
दि. ३० ऑगस्टला १७७९
रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दि. २२ ऑगस्ट ते दि. ३० ऑगस्ट २०२० पर्यंत एकुण ८,६११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
‘सर्व रक्तदात्यांचे हार्दिक आभार’. ????

लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित व के. ई. एम्. रूग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ॲागस्ट ते ३१ ॲागस्ट २०२० पर्यंत २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केले.

आज ३१ ॲागस्ट २०२० महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते सर्व प्लाझ्मादात्यांना तसेच मुंबई व महाराष्ट्र पोलिस दलातील शहीदांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आले.

सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. ????

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निर्णय

‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’

नमस्कार,

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितकारी निर्णय घेतला. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्तं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आरोग्योत्सवाचे ऊद् घाटन हिंदुस्तानचे ज्येष्ठनेते मा. श्री. शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांच्या शुभहस्ते दि. ३ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते.

जीवदान ठरू शकणा-या या आरोग्योत्सव अंतर्गत मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२० पासून प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्लाझ्मादान शिबिरामध्ये आतापर्यंत एकूण २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केले आहे.

तसेच दि. २२ ऑगस्ट २०२० पासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात दि. ३० ऑगस्ट २०२० पर्यंत एकूण ‘१०२७६’ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

दि. १५ जून २०२० रोजी हिंदुस्तान व चीन सीमेवर चिनीशत्रूशी लढताना गलवान खोर्यात हिंदुस्तानचे २२ वीर जवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये दोन लाख प्रदान करण्यात आले.

कोविड काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र व मुंबईतील १११ पोलिसबांधव शहीद झाले.त्यापैकी आतापर्यंत एकूण १०१ शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित
करण्यात आले आहे.

कोविड काळातील अनेक कोविड सेनानींचा सन्मान या आरोग्योत्सव काळात करण्यात आला आहे.

मुंबई महाराष्ट्रात कोरोनाच्या घातक प्रादुर्भावाच्या काळात दि. २३ मार्च २०२० ते १ एप्रिल २०२० या कालावधीत माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच दि. ४ मे २०२० ते ४ जून २०२० या कालावधीत जनता क्लिनिकच्या माध्यमातून संपूर्ण विभागात आरोग्य शिबिरे आयोजित करून जवळजवळ २९ हजार नागरीकांची आरोग्य तपासणी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले होते.

सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी २४६ प्लाझ्मादात्यांवर नगरविकास मंत्री मा.नामदार श्री.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पवृष्टी करून या आरोग्योत्सवील प्लाझ्मादान शिबिराचा समारोप करण्यात आला.. ????

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या