लालबागचा राजाला अयोध्येतून बोलावणे

लालबागचा राजाला अयोध्येतून बोलावणे
अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन आणि मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 ला होणार आहे. याचे विशेष निमंत्रण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक श्री. रवींद्रभाई संघवी व अन्य पदाधिकाऱ्यांनी मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कांबळे, मानद सचिव श्री सुधीर साळवी आणि खजिनदार श्री मंगेश दळवी यांची लालबाग येथील मंडळाच्या कार्यालयात भेट घेतली व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. हा क्षण सर्वांसाठी मोलाचा आणि आनंदाचा आहे. प्राणप्रतिष्ठा उत्सव समितीने यात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सहभागी करून घेतले याचा आनंद आहे. मंडळाचे अध्यक्ष या निमंत्रणाचा सन्मान राखत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्याकडे रवाना झाले आहेत.