Home

६ मार्च २०११ ला सुरूवात झालेल्या लालबागचा राजा डायलिसिस सेंटरला सोमवार दिनांक ६ मार्च २०२३ ला बारा वर्षे अर्थात एक तप पूर्ण झाले.
मंडळाच्या या डायलिसिस सेंटरला एक तप पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मंडळाने “ऋणानुबंध – एक तपाचे” हा कार्यक्रम आयोजित केला होता. या डायलिसिस सेंटरमधे अगदी पहिल्या दिवसापासून ते आजतागायत मंडळासोबत कार्यरत असणारे व डायलिसिस ऊपचार सेवा देणार्‍या अपेक्स किडनी केअर सेंटरच्या प्रती ऋणानुबंध व्यक्त करून मंडळाने त्यांना “सन्मानचिन्ह” प्रदान करून त्यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमाप्रसंगी डायलिसिस ऊपचार घेणार्‍या व्यक्तिंसह त्यांचे सर्व कुटुंबिय आणि अपेक्स किडनी केअर सेंटरचे संचालक सुप्रसिद्ध नेफराॅलाॅजिस्ट डाॅ.श्रीरंग बिच्चू, डाॅ.पराग, श्री. शिरोडकर तसेच अपेक्स किडनी केअर सेंटरचे सर्व कर्मचारी ऊपस्थित होते.

लालबागचा राजा २०२२
जगभरातील ७,०९,४३,०२२ भाविकांनी लालबागचा राजा चे ऑनलाईन दर्शन घेतले, आणि १,६७,६९,३२० भाविक लालबागचा राजाच्या विसर्जन सोहळ्यात ऑनलाईन सहभागी झाले.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…..
#lalbaugcharaja

LR 2022 Social Media Reach All in One Marathi