लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष ८७ वे

या वर्षीचा गणेशोत्सव देशहितासाठी ह्या वर्षी सन २०२० लालबागचा राजाचा गणेशोत्सव साजरा न करता करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भाविकांसाठी सदर वर्षी गणेशोत्सव काळात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘आरोग्य उत्सव’ साजरा करणार आहे.

गणेशोत्सव काळात दहा दिवसात महारक्तदान शिबिर घेणार. करोनाच्या पार्श्वभूमीवर करोना बाधित रुग्णांसाठी मुंबई महानगर पालीकेच्या सहकार्याने प्लाझमा डोनेशन उपक्रम राबविणार.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रूपयांची मदत.

करोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवताना आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलिस कर्मचा-यांच्या कुटुंबियांचा सन्मान.

गलवान खो-यात चीनच्या सीमेवर चीनी सैनिकांशी लढताना हिंदुस्थानची सीमा सुरक्षित ठेवताना देशासाठी वीरमरण येऊन शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान.