लालबागचा राजा गणेशोत्सव २०२२
बुधवार दि. ३१ ॲागस्ट २०२२ रोजी सकाळी ५.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होईल. तद्नंतर लालबागचा राजा गणेशोत्सव २०२२ चा उदघाटन सोहळा पार पडेल आणि त्याचवेळेस लालबागच्या राजाचा वार्षिक अहवाल २०२२ चे प्रकाशन करण्यात येईल. सकाळी ६ः०० नंतर चरण स्पर्शाची व मुख दर्शनाची रांग चालु करण्यात येईल. लालबागचा राजा …
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ युट्युबचा सिल्व्हर बटण पुरस्कार मिळवणारे पहिले गणपती मंडळ ठरले आहे.
Youtube सिल्व्हर प्ले बटण उपलब्ध झाल्यामुळे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आंनदीत आहोत. लालबागचा राजा च्या जगभरातील गणेश भक्तांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही गणेश भक्तांचे कौतुक करीत आहोत. असा अतुलनीय टप्पा गाठल्याबद्दल आम्ही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डिजिटल मीडिया टीमचे अभिनंदन करीत आहोत.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान या पवित्र कार्यातील योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला, राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान २०२२ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले… सदरचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री मा.श्री.राजेशजी टोपे यांच्या हस्ते स्विकारताना मंडळाचे ऊपाध्यक्ष मा.श्री.सागर गुप्ता आणि कार्यकारिणी सदस्य …
लालबागचा राजा गणेश मुहूर्त पूजन
|| लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ || लालबागचा राजा २०२२, वर्ष ८९ वे. “लालबागचा राजा गणेश मुहूर्त पूजन” शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत. स्थळ : हनुमान मंदिर, लालबागचा राजा मार्ग, श्री गणेश नगर, लालबाग, मुंबई – ४०० ०१२. ”लालबागचा राजा गणेश मुहूर्त पूजन” सदर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या …
लालबागचा राजाचा लाडु प्रसाद मुंबई-पुण्यासाठी JioMart वापरून ऑनलाइन ऑर्डर सुरू केली
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे या वर्षी चे हे ८८ वे वर्ष ! शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत या वर्षीचा गणेशोत्सव कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने साजरा होणारा आहे. या मध्ये प्रामुख्याने सर्व भाविकांचे दर्शन ॲानलाईन …
लालबागचा राजाचा लाडु प्रसाद मुंबई-पुण्यासाठी JioMart वापरून ऑनलाइन ऑर्डर सुरू केलीRead More
रक्तदान व प्लाझ्मादान
लालबागचा राजा आरोग्योत्सवात प्लाझ्मादानाचे द्विशतक पार. सर्व प्लाझ्मादात्यांचे हार्दिक आभार. 🙏 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने सुरू असलेल्या आरोग्योत्सव अंतर्गत रक्तदान शिबीरास रक्तदाते प्रचंड प्रतिसाद देत आहेत.दि. २२ ऑगस्टला ४४४,दि. २३ ऑगस्टला ९३०,दि. २४ ऑगस्टला ८१५,दि. २५ ऑगस्टला ९३४,दि. २६ ऑगस्टला ८६०,दि. २७ ऑगस्टला ८०२,दि. २८ ऑगस्टला ७४४,दि. २९ ऑगस्टला १३०३,दि. ३० ऑगस्टला १७७९रक्तदात्यांनी …
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन निर्णय
‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ नमस्कार, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितकारी निर्णय घेतला. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षाकारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्तं आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आरोग्योत्सवाचे ऊद् …
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव
मागिल वर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सव साजरा केला.यावर्षी मात्र मंडळाने कोरोनाची सध्याची एकंदर परिस्थिती पाहता करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचा उत्सव महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दि. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा करण्याचे ठरविले आहे. या उत्सवकाळात सर्व भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन …
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीनुरूप आरोग्योत्सवRead More
लालबागचा राजा डायलिसिस सेंटर
लालबागचा राजा डायलिसिस सेंटर….अनेक डायलिसिसरूग्णांसाठी आश्वासक आणि विश्वासार्ह असे जीवनदायी सेंटर…कोविड महामारीच्या काळात जेव्हा सर्व डायलिसिस सेंटर बंद होत होते तेव्हा शेकडो डायलिसिस रुग्णांसाठी भक्कमपणे आधार देऊन दिवसरात्र अविरत व अविश्रांत सेवा पुरवित होते ते फक्त आणि फक्त लालबागचा राजा डायलिसिस सेंटर…. श्रीमान राजीव निवतकर.IAS.जिल्हाधिकारीमुंबई शहर.मंडळाच्या लालबागचा राजा डायलिसिस सेंटरला महाराष्ट्र शासनाकडून *प्रशंसापत्रक*