लालबागच्या राजाचे दर्शन २०१७

सर्वांचे आभार!

दि २९ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबई शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक चाकरमाने, नागरिक आणि भाविक यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक कार्यकर्ते, भाविक आणि नागरिक यांनी पुढे येऊन पावसामुळे अडकलेल्या लोकांना मदत केली. मंडळातर्फे चहा, नाश्ता आणि राहण्याची सोय करण्यात आली होती. अनेकांनी यात प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सर्व विसरून मदत केली.

लालबागचा राजा’च्या फेसबुक, ट्विटरवर आपल्या शुभेच्छा, आशीर्वादाचा अक्षरशः पाऊस पडला. आपल्याला पावसामुळे झालेल्या अडचणी प्रत्यक्षपणे आणि सोशल माध्यमांवर सोडवायचा प्रयत्न मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून केला. या सर्वांसाठी लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वांचे मनापासून आभारी आहे. सर्व नागरिक, भाविक, मुंबई पोलीस, प्रशासन, अधिकारी वर्ग, नेते, ज्यांनी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कालच्या संकटाच्या वेळी मदत केली त्या सर्वांचे मंडळ मनापासून आभारी आहे.

लालबागचा राजाचे दर्शन सुरु आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी आमच्या ऑफिसिअल फेसबुक आणि ट्विटर अकॉऊंटला भेट देत राहा.

– लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई

लालबागच्या राजाचे दर्शना साठी येण्यारया सर्व भाविकांसाठी :

भाविकांसाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून खास संदेश

सध्या काही माध्यमांवर लालबागचा राजा’चे जोरदार वृष्टीमुळे दर्शन बंद केले असल्याच्या बातम्या देण्यात येत आहेत. या सर्व बातम्या खोट्या असून मंडळाच्या अतिशय चोख नियोजनामुळे दर्शन सुरळीत सुरु आहे. अनेक भाविक राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. तरीही भाविकांनी खोट्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.

Important: लालबागचा राजा मंडळाकडून पावसामुळे अडकलेल्या नागरिकांसाठी तात्काळ जेवणाची आणि नाश्त्याची व्यवस्था. भाविकांनी कोणतीही चिंता करू नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. #MumbaiRains

– लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग मुंबई

लालबागच्या राजाचे दर्शन सर्व भाविकांसाठी :

शुक्रवार दि. २५ ऑगस्ट २०१७ ते सोमवार दि. ४ सप्टेंबर २०१७ पर्यंत चोवीस तास दर्शनासाठी खुले राहील.

लालबागच्या राजाचे चरण स्पर्शाची रांग :

लालबागच्या राजाचे चरण स्पर्शा साठी आलेल्या भाविकांची रांग ग. द. आंबेकर मार्गावरुन लागेल. या ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांनी करीरोड – भारतमाता सिनेमा – साईबाबा पथ – ग. द. आंबेकर मार्ग – अभ्युदय नगर या मार्गाचा वापर करावा. रेल्वे मार्गाने येणाऱयांनी मध्य रेल्वेचे करीरोड स्थानक वा पश्चिम रेल्वेचे लोअर परेल स्थानक अथवा हार्बर मार्गाचे कॉटनग्रीन स्थानक येथे उतरावे.

सोमवार दि. ४ सप्टेंबर २०१७ रोजी चरण स्पर्शाचि रांग सकाळी १०.०० वा. बंद करण्यात येईल.

लालबागच्या राजाचे मुखदर्शनाची रांग :

लालबागच्या राजाचे मुख दर्शन घेऊ इच्छिणाऱया भाविकांची `मुख दर्शन रांग’  ही रांग दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथून चालू होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण (गरमखाडा) मार्गे श्रीं च्या आवारात येईल. मुख दर्शन घेऊन इच्छिणाऱया भाविकांनी मध्य रेल्वे मार्गाचे चिंचपोकळी स्थानक अथवा हार्बर रेल्वे मार्गाचे कॉटनग्रीन स्थानक येथे उतरावे.

सोमवार दि. ४ सप्टेंबर २०१७ रोजी मुखदर्शनाचि रांग रात्रौ १२.०० वा. बंद करण्यात येईल.