महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे रक्तदान या पवित्र कार्यातील योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला, राज्यस्तरीय रक्तदाता गौरव सन्मान २०२२ हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले…
सदरचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री मा.श्री.राजेशजी टोपे यांच्या हस्ते स्विकारताना मंडळाचे ऊपाध्यक्ष मा.श्री.सागर गुप्ता आणि कार्यकारिणी सदस्य मा.श्री.निलेश महामुणकर.

Lalbaugcharaja Ganesh Muhurt Poojan 2022

लालबागचा राजा गणेश मुहूर्त पूजन

Lalbaugcharaja Ganesh Muhurt Poojan 2022

|| लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ||
लालबागचा राजा २०२२, वर्ष ८९ वे.
“लालबागचा राजा गणेश मुहूर्त पूजन”
शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत.
स्थळ : हनुमान मंदिर, लालबागचा राजा मार्ग, श्री गणेश नगर, लालबाग, मुंबई – ४०० ०१२.
”लालबागचा राजा गणेश मुहूर्त पूजन” सदर सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत सोशल मिडिया साईटवर उपलब्ध असेल.
मंडळाचे अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
www.lalbaugcharaja.com
मंडळाचे अधिकृत यूट्यूब चॅनल:
https://www.youtube.com/user/LalbaugRaja
मंडळाचे अधिकृत फेसबुक पेज:
https://www.facebook.com/LalbaugchaRaja/
मंडळाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट:
https://twitter.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट:
https://instagram.com/lalbaugcharaja
मंडळाचे अधिकृत Android and iOS App : Lalbaugcharaja
#lalbaugcharaja

लालबागचा राजाचा लाडु प्रसाद मुंबई-पुण्यासाठी JioMart वापरून ऑनलाइन ऑर्डर सुरू केली


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे या वर्षी चे हे ८८ वे वर्ष ! शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत या वर्षीचा गणेशोत्सव कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका तसेच पोलिस प्रशासनाने नेमुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने साजरा होणारा आहे. या मध्ये प्रामुख्याने सर्व भाविकांचे दर्शन ॲानलाईन होणार आहे. लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा प्रसाद मंडळ ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ ॲपच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे.
यावर्षी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा चा लाडू प्रसाद ऑनलाईन पद्धतीने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ उपलब्ध करून देणार आहे.
हा लालबागच्या राजाचा प्रसाद दोन लाडुंच्या स्वरुपात असून त्याचे शुल्क रु.७०/- इतके सवलतीच्या दरात असणार आहे.