लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ युट्युबचा सिल्व्हर बटण पुरस्कार मिळवणारे पहिले गणपती मंडळ ठरले आहे.

Youtube सिल्व्हर प्ले बटण उपलब्ध झाल्यामुळे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आंनदीत आहोत. लालबागचा राजा च्या जगभरातील गणेश भक्तांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही गणेश भक्तांचे कौतुक करीत आहोत. असा अतुलनीय टप्पा गाठल्याबद्दल आम्ही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डिजिटल मीडिया टीमचे अभिनंदन करीत आहोत.